ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील नृत्यस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.या स्पर्धेसाठी भारतातून नृत्य क्षेत्रातील आणि नृत्य प्रकारांमधील क्लासिकल, बॉलिवूड अशा प्रकारांमध्ये ग्रुप आणि सोलो नृत्यासाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत सर्व नृत्य संस्था तसंच ग्रुप विविध नृत्य प्रकारातील वैयक्तीक स्पर्धक देखील सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेच्या ऑडिशन्स ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, कुडाळ, वडोदरा इथे होणार असून ऑनलाईनही ऑडिशन्स होणार आहेत. अधिक माहितीसाठी विजया शिंदे यांच्याशी ९९३०६६२००६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.