ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होणा-या भागांची सैन्यदलातर्फे पाहणी

ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होणा-या भागांची सैन्यदलातर्फे पाहणी करण्यात आली. महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाली तर तत्काळ मदत आणि बचावकार्य करता यावे यासाठी भारतीय सेनेच्या कलिना कॅम्पमधील नायब सुभेदार संजीव एस यांच्यासह तीन सुभेदारांनी मंगळवारी शहराचा पाहाणी दौरा करून सखल भागांची माहिती घेतली. ठाणे महापालिका क्षेत्रातील सखल भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. अतिवृष्टी झाल्यास काही सखल भागांमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचते. यामुळे परिसरातील गृहसंकुलांमधील नागरिकांचा मार्गच बंद होतो. काही ठिकाणी चाळींमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करावे लागते. वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, साकेत, दिवा येथील खर्डीगाव, साबेगाव आणि देसाई नाका येथील रिव्हरवूड पार्क या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यंदाच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांना तत्काळ मदत आणि बचावकार्य करता यावे यासाठी भारतीय सेनेच्या कलिना कॅम्पमधील नायब सुभेदार संजीव एस यांनी पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading