ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे नेते किरिट सोमैय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. किरिट सोमैय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हीडीओ प्रकरणावरून ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात विविध ठिकाणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या विरोधात आंदोलन पुकारले होते. ठाण्यातही खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला शिवसैनिकांनी किरिट सोमैय्या यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत त्यांची प्रतिमा पायदळी तुडवत आंदोलन केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading