ठाण्यामध्ये दुचाकीच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

ठाण्यामध्ये काल झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. साकेत रस्त्यावरून क्रीक नाक्याकडे जाणा-या रस्त्यावरून हे दुचाकी स्वार दुपारी ३ च्या सुमारास चालले होते. त्यावेळी त्यांचा होंडा शाईन या दुचाकीचा ताबा सुटला आणि ही दुचाकी रस्ता दुभाजकाला आणि वीजेच्या खांबाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कृष्णकांत पाटील आणि उमेश पाटील असा दोघांचा यामध्ये मृत्यू झाला असून हे दोघेही घणसोलीचे रहिवासी आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading