ठाण्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसात हवेतील गारठा चांगलाच वाढला आहे. ऐन कोरोनाच्या काळात झालेल्या गारठ्यातील वाढीमुळे चिंता वाढली आहे. सध्या तापमानाचा पारा हा जवळपास १५ अंश सेल्सियसच्या घरात पोहचला आहे. अगदी दुपारीही २०-२१ अंश सेल्सियस तापमान पहायला मिळत आहे. त्यामुळं हवेत अंगाला झोंबणारा गारवा अनुभवाला येत आहे. हवामानातील या बदलामुळे सध्या आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. हवेतील गारव्यामुळे सध्या सर्दी-खोकला वाढला आहे. कोरोना काळातील या सर्दी-खोकल्यामुळे प्रत्येकालाच कोरोनाची भीती वाटत आहे.