ठाण्यामध्ये तळवलकर व्यायाम शाळेसमोर अचानक रस्ता खचल्याने खळबळ

ठाण्यामध्ये तळवलकर व्यायाम शाळेसमोर अचानक रस्ता खचल्याने खळबळ उडाली आहे. स्मार्ट सिटी म्हणून ठाण्याचं कौतुक होत असतानाच अशा प्रकारामुळे ठाण्याच्या नावाला डाग लागत आहे. एकीकडे महापालिका आयुक्त ठाणेकरांना योग्य त्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे निकृष्ट दर्जाच्या कामाचा ठाणेकरांना त्रास होत आहे. सध्या सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचे पेव फुटले आहे मात्र असे रस्ते खचायला लागले तर त्यांचा काय उपयोग असा प्रश्न निर्माण होत आहे. अचानक खचलेल्या या रस्त्यामध्ये एका ट्रकचं चाक अडकलं होतं. सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही. महापालिकेचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी वेळीच ही बाब महापालिका आणि ठेकेदारांच्या निदर्शनास आणली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading