ठाण्यामध्ये झालेल्या जोरदार पावसात कोलबाड येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावर झाड पडून ५ जण जखमी

ठाण्यामध्ये झालेल्या जोरदार पावसात कोलबाड येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावर झाड पडून ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री ८ च्या सुमारास ठाण्यात आज पुन्हा जोरदार पाऊस कोसळत होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली. याची तक्रार दाखल झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी उपस्थित आहेत. हे झाड पडल्याने राजश्री वालावरकर, प्रतिक वालावरकर यांना दुखापत झाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कीविन्सी परेरा, सुहासिनी कोलुंगडे आणि दत्ता जावळे या तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading