जिल्ह्यात कोरोनाचे १७० नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १७० नवे रूग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १ हजार ५३७ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९५३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ६१ रूग्ण आढळले. सध्या ५५० रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १५६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १३ रूग्ण आढळले. सध्या १४० रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६१ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ७५ नवे रूग्ण आढळले. सध्या ६१० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५४ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ३ रूग्ण आढळले. सध्या ५६ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ९ रूग्ण तर सध्या ८४ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६६५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ३ रूग्ण, सध्या १२ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण तर ५३ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये ६ रूग्ण आढळले. सध्या ५८ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading