ठाण्यामध्ये आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण

ठाण्यामध्ये आजपासून महापालिकेच्या वतीनं १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्या हस्ते या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. १२ ते १४ वयोगटातील लाभार्थींसाठी ठाणे महापालिकेला ३५ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. आजच्या पहिल्या दिवशी पार्कींग प्लाझा येथील कोविड रूग्णालयात लसीकरण सुरू झालं असून महापालिकेला मिळणा-या लसीनुसार शाळांमध्ये लसीकरण सत्र सुरू केलं जाणार आहे. या लसीचा दुसरा डोस २८ दिवसांच्या अंतराने दिला जाणार आहे. सध्या कोविड संसर्ग कमी झाला असला तरी १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या पालकांनी लवकरात लवकर लसीकरणाचा लाभ घेण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं. ठाण्यामध्ये आजपर्यंत पहिला डोस १६ लाख ३४ हजार तर दुसरा डोस १३ लाख ६१ हजार जणांना देण्यात आला आहे. तर ४८ हजार ९६४ जणांना बूस्टर डोस देण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading