ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं निदर्शनं

जेएनयु मधील अन्याय्य शुल्क वाढीविरोधातील आंदोलनाला दडपण्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ठाण्यात सम्यक
विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी जेएनयु मधील विद्यार्थ्यांच्या वसतीगृह शुल्क वाढीच्या
आंदोलनाला पाठिंबा देणा-या विद्यार्थ्यांवर पोलीसांनी जो अमानुष लाठीमार केला त्याचा निषेध करण्यात आला. सरकारनं
यापुढे पोलीस बलाचा वापर शांततामय आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर करू नये याबाबत कायदा करावा अशी मागणी
यावेळी करण्यात आली. कॅटच्या अहवालानुसार २.१८ लाख कोटींचा निधी शिक्षण आणि स्वच्छतेसाठी जमा करण्यात
आला आहे. त्याचा वापर न करता हा फंड तसाच पडून आहे. हा फंड विद्यापीठात शिकणा-या गरीब मागासवर्गीय
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, वसतीगृहांचा विकास, पुनर्बांधणी, सफाई यांच्या शिक्षणासाठी वापरावा अशी मागणीही
आंदोलनाच्या वतीनं करण्यात आली. जिल्हाधिका-यांना या आशयाचं निवेदनही यावेळी देण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading