केबल व्यापा-यावर गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या ६ आरोपींना अटक

केबल व्यापा-यावर गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या ६ आरोपींना ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली
आहे. कल्याण बाजारपेठेत राहणारे मुदत्सर उर्फ मुनवर मजिद याच्यावर रात्री दुचाकीवरून आलेल्या मुनवर शेख, ईर्शाद
कुरेशी या दोघांनी गोळीबार केला होता. त्यात मुदत्सर थोडक्यात बचावले होते. त्यांच्या मांडीला आणि उजव्या बोटाला गोळी
लागली होती. या गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथकातर्फेही केला जात होता. खंडणी विरोधी पथकातील हवालदार
कल्याण ढोकणे यांना या प्रकरणातील आरोपी हे राबोडी येथे राहणारे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चौघांना
अटक करण्यात आली. त्यांच्या सखोल चौकशीअंती ईस्माईल मांडेकर याने निहाद करेल याला मुदत्सरला मारण्यासाठी ५
लाखांची सुपारी दिल्याची माहिती मिळाली होती. मुदत्सरचं ईस्माईलच्या बहिणीबरोबर लग्न झालं होतं. तो तिला रोज
मारहाण करून पैशांची मागणी करत असे आणि ते पैसे बाहेर उधळत असे. तसंच त्याचे एका बारगर्ल बरोबर अनैतिक संबंध
होते त्याचाही राग ईस्माईलच्या मनात होता. त्यामुळेच त्याने मुदत्सरला ठार मारण्यासाठी ५ लाखांची सुपारी दिली होती.
यातील दोघांनी शैबाझ पोके आणि आफताब शेख यांनी मुदत्सरचा पाठलाग केला होता आणि त्याची माहिती मुनवर आणि
ईर्शाद यांना दिली होती. या प्रकरणातील सहाही आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading