ठाण्यात सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस

ठाण्यात आज पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. गेले काही दिवस पावसानं विश्रांती घेतली होती. त्यामुळे हवेतील उष्म्यातही वाढ झाली होती. आज पहाटेपासूनच पावसानं जोर धरला होता सकाळी १० वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता. आज सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासात ५९ मिलीमीटर पाऊस पडला असून आत्तापर्यंत १४६३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर गेल्यावर्षी आजपर्यंत १२६५ मिलीमीटर पाऊस झाला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading