कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम प्रगतीपथावर

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम प्रगतीपथावर असून ठाणे महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार आज महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या कामाची पाहणी केली. शहरातील पर्यटनास चालना देण्यासाठी महापालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी लि.अंतर्गत ३.३६ हेक्टर क्षेत्रात वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या कामाची माळवी यांनी पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये पर्यावरणभिमुख गॅबियन भिंती, पाथवे, तसेच उद्यान विषयक कामाची पाहणी करून सर्व कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच या परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून इतर उद्यान विषयक सर्व कामे ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading