ठाण्यात येत्या शुक्रवारी काही भागात पाणीपुरवठा 24 तास बंद

ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा शुक्रवारी 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. महापालिकेच्या स्वत:च्या योजनेचा आणि स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार 08 sept रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून ते शनिवार 09 sept रोजी सकाळी 9.00 वा पर्यत 24 तासांचा शटडाऊन घेऊन निगा देखभाल आणि दुरूस्तीमधील अत्‌यावश्यक आणि तातडीची कामे करुन घेण्यात येणार आहेत. परिणामी, या शटडाऊन कालावधीत शहरातील घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading