ठाण्यात मोफत दिव्यांग सहाय्य साहित्य वाटप शिबीर संपन्न

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकार आणि एलिम्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात पहिल्यांदाच मोफत दिव्यांग सहाय्य साहित्य वाटप शिबीर ठाण्यात संपन्न झाल. आपल्या मतदारसंघातील नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा फायदा मिळावा यासाठी खासदार राजन विचारे यांनी मतदारसंघातील दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय त्यांच्याकडे पत्र व्यवहार करून या पूर्वी ठाणे , नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी शिबिरे आयोजित केली.या साहित्यांसाठी केंद्र शासनाकडून ७५ लाखापेक्षा जास्त निधी मिळवून दिला होता. या साहित्यांसाठी २१ लाख निधी मंजूर करण्यात आला होता. ठाण्यात २७ जानेवारी रोजी झालेल्या शिवसमर्थ विद्यालयातील दिव्यांग सहाय्य शिबिरामध्ये ८०० पेक्षा जास्त दिव्यांगानी लाभ घेतला होता. त्यामध्ये अनेक दिव्यांगांची तपासणी करून आवश्यक लागणाऱ्या कागदपात्रे जमा करून त्यांना आवश्यक असणाऱ्या सामानांची माहिती गोळा करून ३९५ लाभार्थ्यांची यादी खासदार राजन विचारे यांनी केंद्र शासनाच्या एलिम्को कंपनीकडे सुपूर्त केली आणि त्या अनुषंगाने ३९५ लाभार्थ्यांचे मोजमाप केलेले कृत्रिम हात, पाय तसेच थ्री सायकल, वॉकिंग स्टिक, व्हील चेअर, सी पी चेअर, अंध असलेल्या दिव्यांगांसाठी ब्रेल स्लेट, ब्रेल कीट, स्मार्ट कॅन, डीझी प्लेयर, स्मार्ट फोन विथ स्क्रीन रीडिंग तसेच कर्ण बधीर दिव्यांगांसाठी बी टी ई डिजिटल टाईप हेअरिंग एड विथ बॅटरी, मतीमंद दिव्यांगांसाठी मिस किट आणि इतर साहित्य वाटप करण्यात आले या साहित्यांसाठी ३४ लाख निधी उपलब्ध करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading