ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन

फ्रेण्ड्स ऑफ पुर्वेश सरनाईक कम्युनिटीच्या माध्यमातून ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन २० ते २३ एप्रिल पर्यंत करण्यात आलं आहे. घोडबंदर रोडवरील महापालिकेच्या मैदानात या समर वंडरलँडचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला विरंगुळ्याचे क्षण हवे असतात मग ती व्यक्ती कोणत्याही वयोगटातील असो. हेच लक्षात घेऊन युवासेनेचे नेते पुर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून समर वंडरलॅन्ड या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्ती यात आनंद लुटू शकणार आहे. लहान मुलांकरिता गेम्स, आर्ट वर्कशॉप तसेच कुकींग वर्कशॉप्स राबविले जाणार आहेत. सायंकाळी लाईव्ह म्युझिकचा आनंद सर्वांना अनुभवता येणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध ब्रॅण्ड्सच्या स्टॉल्सची रेलचेल असणार असून खवय्यांसाठी विविध मेजवानीचे स्टॉल्सही असणार आहेत. जेणेकरून आल्हाददायक संगीताचा आनंद घेऊन लज्जतदार खाण्याची मजा सर्वजण लुटू शकणार आहेत. मुलांसाठी एका वेगळ्या गेम झोनची निर्मिती केली जाणार आहे, जिथे लहान मुलं मनसोक्त खेळतील आणि आनंदाने बागडू शकतील. या फेस्टिव्हलचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात नागरिकांना आपल्या सोबत आपआपल्या पाळीव प्राण्यांनाही आणण्याची मुभा असून अशा प्राण्यांकरिता विशेष जागा म्हणजेच पेट पार्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच तिथे त्या प्राण्यांच्या ट्रेनिंग आणि देखभाल करण्यासंबंधीचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. याचबरोबर फिटनेस प्रेमी, कसरत प्रेमी तसेच व्यायाम करणा-यांसाठी एप्रिल आणि मे महिन्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी ६ ते ९ या वेळेत रौनक पार्क येथील नवीन रस्त्यावर ’फिट अँड फन, ठाणे“ हा अनोखा उपक्रम ही राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत योगा, कोअर फिट, झुब्बा, सायकलिंग, स्केटींग अश्या विविध व्यायाम प्रकार शिकविले जात आहेत. त्याचबरोबर लहान मुलांकरिता पैंटिंग, कॅलिग्राफीचे वर्कशॉप ही घेतले जात आहेत. सशक्त शरीर, उत्तम शारिरीक आणि मानसिक आरोग्य जोपासणे याबाबतीत जनजागृती करून नागरिकांमध्ये जास्तीत जास्त व्यायाम आणि कसरतीकडे वळावे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.अशा प्रकारचा उपक्रम ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असून फ्रेण्ड्स ऑफ पुर्वेश सरनाईक ही कम्युनिटी या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading