ठाण्यात थंडीचा कडाका

ठाण्यातील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित असलेली थंडी आता सुरू झाली आहे. ठाण्यातील तापमानाचा पारा हा चांगलाच खाली आला आहे. साधारणपणे ३० अंश सेल्सियस असणारा पारा जवळपास १८ अंशापर्यंत खाली आला आहे. यामुळं अंगात हुडहुडी भरणारी थंडी जाणवू लागली आहे. आज सकाळपासूनच हवेतील गारठा जाणवत होता. सकाळी फिरायला जाणारी मंडळी स्वेटर, कानटोप्यांचा आधार घेताना दिसत होती. साधारणत: दिवाळीच्या आधीपासून थंडी सुरू होते. यंदा मात्र थंडी काहीशी लांबली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास तापमान २१ अंश सेल्सियस होतं ते सकाळी साडेसात वाजता १८ अंशावर आलं होतं. पण आता हवेत चांगलाच गारठा निर्माण झाला असून सर्वसामान्य ठाणेकर या सुखद गारव्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading