ठाण्यात तात्पुरत्या स्वरुपात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा राहणार बंद – एकेका विभागात पंधरा दिवसातून एकदा पाणी राहणार बंद

अतिवृष्टीमुळे ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे पंपिंग केंद्र येथे नदीतून येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या व गाळ आहे. त्याचा पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे, पिसे आणि टेमघर येथील वीज पुरवठा खंडित होणे, विद्युत जनित्रात तांत्रिक बिघाड होणे या घटनांमुळे शहरास आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मंगळवार, ०१ ऑगस्टपासून पावसाळ्याचा जोर कमी होईपर्यंत शहरात तात्पुरत्या स्वरूपात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानुसार, पंधरा दिवसातून एकदा एकेका विभागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येईल.
नागरिकांनी या काळात आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवावा. पाणी काटकसरीने तसेच, गाळून व उकळूनच वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

विभागवार पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे वेळापत्रक

वार, कनेक्शनचे ठिकाण, पाणी पुरवठा बंदची वेळ
• सोमवार, ब्रम्हांड, बाळकुम, स. ९ ते रा. ९
• मंगळवार, घोडबंदर रोड, दु. १ ते सायं ५
• बुधवार, गांधीनगर, स. ९ ते रा. ९
• गुरूवार, उन्नती, सुरकरपाडा, सिद्धाचल, स. ९ ते रा. ९
• शुक्रवार, मुंब्रा–रेतीबंदर, स. ९ ते रा. ९
• शनिवार, समता नगर, स. ९ ते रा. ९
• रविवार, दोस्ती आकृती, स. ९ ते रा. ९
• सोमवार, जेल, स. ९ ते रा. ९
• मंगळवार, जॉन्सन-इटरनिटी, स. ९ ते रा. ९
• बुधवार, साकेत-रुस्तमजी, स. ९ ते रा. ९
• गुरूवार, सिद्धेश्वर, स. ९ ते रा. ९
• शुक्रवार, कळवा-खारेगाव-आतकोणेश्वर नगर, स. ९ ते रा. ९
• शनिवार, इंदिरा नगर, स. ९ ते रा. ९
• रविवार, ऋतूपार्क, स. ९ ते रा. ९

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading