ठाण्यात घनकचरा प्रकल्पाला “स्वराज्य सामाजिक संस्था” आणि स्थानिक रहिवाशां विरोध

ठाण्यात घनकचरा प्रकल्पाला “स्वराज्य सामाजिक संस्था” आणि स्थानिक रहिवाशां विरोधचा आहे.
ओवळा माजीवाडा मतदार संघातील विद्यानिकेतन शाळा, लक्ष्मी पार्क फेज १, लोकमान्य नगर येथील घनकचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प हा २ टन वजनी प्रकल्प असून त्यामुळे आसपासच्या किमान दहा ते पंधरा हजार नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. याकरिता स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाचा निषेध दर्शवत प्रकल्प हटवण्याची मागणी केली आहे. या करिता आसपासच्या नवशिवम सोसायटी यशोधन नगर,वैभव अपार्टमेंट, साई दीप सोसायटी,बालाजी हाईट्स,विठ्ठल सदन आदी सोसायट्यांनी एकत्रित येऊन ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि घनकचरा विभागाला लेखी निवेदन दिले आहे. स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष संजय देवकर,शास्त्री नगर सहकार नगर चे उपविभागप्रमुख अशोक कुळकर्णी तसेच दिनेश शेट्ये आदींच्या सह्या निवेदनावर आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading