ठाण्यात गावंड बाग येथे मिळाला आठ फूटाचा अजगर

ठाण्यामध्ये एक आठ फूटाचा अजगर मिळाला आहे. उपवन येथील गावंड बागेतील किरकिरे चाळीमधील हा अजगर आढळला होता. हा अजगर दिसताच त्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्र अमन सिंग, रवि शिंदे आणि संकेत भांगरे यांनी या अजगराला शिताफीने पकडले. नंतर या अजगराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading