ठाण्यात काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाअंतर्गत काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने संयुक्तरीत्या ही गौरव यात्रा काढण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर स्तंभ ,गडकरी रंगायतन येथून स्मारकाला वंदन करून यात्रेला प्रारंभ झाला. गडकरी रंगायतन, दगडी शाळा, गजानन महाराज चौक, राम मारुती रोड, गोखले रोड, नौपाडा पोलीस स्टेशन, हरी निवास, पाचपाखाडी, ठाणे महापालिका, नितीन कंपनी, रामचंद्र नगर, वैती वाडी, संत ज्ञानेश्वर नगर, कामगार हॉस्पिटल चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, यशोधन नगर चौक, वर्तक नगर, शास्त्रीनगर चौक, शिवाई नगर, बेथने हॉस्पिटल, वसंत विहार आणि काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या यात्रेचा समारोप करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading