ठाण्यात इनपूट टॅक्स क्रेडीट प्रकरणी १२ कोटींच्या फसवणुकीचा प्रकार

ठाण्याच्या केंद्रीय वस्तू आणि सेवाकर आयुक्तालयानं १२ कोटींच्या इनपूट टॅक्स क्रेडीट फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वस्तू आणि सेवाकर आयुक्तालयानं दिली आहे. भंगारचा व्यवसाय करणा-या एका फर्मविरूध्द याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीएसटी कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा न घेता इनपूट टॅक्स क्रेडीट मिळवलं जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड मध्ये शोध घेण्यात आला. पोलीसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading