ठाण्यातून बेपत्ता झालेल्या सराफ भरत जैन यांचा मृतदेह मिळाला कळवा खाडीत

ठाण्यातून बेपत्ता झालेल्या सराफ भरत जैन यांचा मृतदेह कळवा खाडीत मिळाला. पाच दिवसापासून ते बेपत्ता होते.

ठाण्यातील मखमली तलाव येथील निळकंठ सोसायटी मध्ये राहणारे सोन्या चांदीचे व्यापारी भरत जैन हे पाच दिवसापासून बेपत्ता झाले होते, त्यांचे चरई येथील दगडी शाळेजवळ दत्त अपार्टमेंट मध्ये बी के ज्वेलर्स नावाचे दुकान आहे,14 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ते आपल्या घरातून निघाले. जाताना आपल्या पत्नीला दुकानात जात असल्याचे सांगितले, पण त्या नंतर ते घरी परतलेच नाहीत दिवसभर वाट बघून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा इतरत्र शोध घेतला पण कुठेच मिळून न आल्या मुळे त्यांनी 15 ऑगस्टला नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये मिसिंगची तक्रार नोंदवली होती

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading