ठाण्यातील 128 वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठी ग्रंथसंग्रहालयाची येत्या रविवारी निवडणूक

ठाण्यातील 128 वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाची येत्या रविवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी विद्यमान कार्याध्यक्ष, पत्रकार आणि साहित्यिक अरुण करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली पॅनेल उभे करण्यात आले असून त्या पॅनेलला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन विद्यमान अध्यक्ष विद्याधर वालावलकर आणि कार्याध्यक्ष अरुण करमरकर यांनी केले आहे. संस्थेचे पाच उपाध्यक्ष तसेच चार कार्यवाह यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून अध्यक्षपदासाठी दोन तर अकरा कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी चौदा उमेदवार उभे आहेत. विद्यमान व्यवस्थापक मंडळाच्या कालावधीत गेल्या दहा वर्षांमध्ये दुर्मिळ अशा सुमारे 18 हजार ग्रंथांचे डिजिटायझेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले. ग्रंथयान या फिरत्या वाचनालयाची अनोखी व्यवस्था, 100 विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वातानुकूलित अभ्यासिका, वाचनसंस्कृतीच्या अभिवृद्धीसाठी विविध कल्पक उपक्रमांचे आयोजन या काळात करण्यात आले. अध्यक्षपदासाठी अरुण करमरकर, कार्यकारणी सदस्य म्हणून विद्याधर वालावलकर, सीमा दामले, आशा जोशी, अश्विनी बापट, संजीव फडके आणिसुजय पत्की निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading