ठाणे जिल्हा न्यायालयात खास वकीलांसाठी लसीकरण मोहिमेचं आयोजन

ठाणे जिल्हा न्यायालयात खास वकीलांसाठी लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. न्यायालयातील बाररुममध्ये आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 350 जणांचे लसीकरण करण्यात आले. कोरोना काळातही वकिलांचे काम अविरतपणे सुरू होते, वकील हा समाजव्यवस्थेतील महत्वाचा घटक असल्याने त्यांचा दिवसभरात अनेक नागरिकांशी सतत संपर्क येत असतो, न्यायालयात असलेल्या दाव्यांसाठी त्यांना नियमित न्यायालयात यावे लागत होते, यासाठी त्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने व्हावे या दृष्टीने यापूर्वी ठाणे महापालिकेच्या वाडिया दवाखान्यात तीन वेळा आणि बार रुम येथे लसीकरण शिबिर आयोजित केले होते. परंतु अद्यापपर्यत ज्या वकिलांचे लसीकरण झाले नाही तसेच ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, अशा वकिलांसाठी आज बार रुममध्ये विशेष लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोविशिल्ड लसीचे 300 आणि कोवॅक्स‍िन लसीचे 50 डोस उपलब्ध करुन देण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हान्यायाधीश अनिल पानसरे, एन.के ब्रह्मे, ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत कदम उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading