ठाण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अभ्यास अभियांत्रिकीचे विद्यार्थी करणार

स्मार्ट सिटीच्या दृष्टीनं वाटचाल करत असलेल्या शहरातील विविध प्रकल्पांचा अभ्यास अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी करणार असून महापालिका राबवत असलेल्या प्रकल्पांची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांनी प्रशिक्षणार्थींना दिली. स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना, डिजी ठाणे, शहर विकास विभागातर्फे राबवण्यात येणा-या विविध प्रकल्पांचा हे प्रशिक्षणार्थी अभ्यास करून स्वतंत्ररित्या अहवाल सादर करणार आहेत. उत्कृष्ट अहवाल सादर करणा-या विद्यार्थ्यांचा गौरव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading