ठाण्यातील सानिका वैद्यला पॅरा स्विमींग चॅम्पीअनशीप स्पर्धेमध्ये 2 पदके

ठाण्यातील सानिका वैद्य हिचा 20 व्या नॅशनल पॅरा स्विमींग चॅम्पीअनशीप 2020-21 बेंगलोर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 2 पदके मिळवली आहेत. 21 आणि 22 मार्चला बेंगलोर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 200 मीटर फ्रीस्टाईमध्ये तिसरा क्रमांक मिळवून ब्रॉन्झ तर 100 मीटर मध्ये ब्रेस्टस्ट्रोक मध्ये दुसरा क्रमांक मिळवून सानिकाने सिल्वर पदक पटकवलं. लॉकडाऊनमुळे स्विमींग पूल बंद होते, रोजचा सराव होत नव्हता. पण नॅशनल स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आणि अक्षरश: दहा दिवस सराव करुन ती या स्पर्धेत उतरली आणि तिने ठाणे जिल्ह्याचे नाव मोठे केले. तिच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading