तिथीनुसार शिवजयंती साजरी – मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे जल्लोष नाही

तिथीनुसार आज शिवजयंती साजरी होत आहे. मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे आज शिवजयंती असल्याची वातावरण निर्मितीच झाल्याचं कुठेही दिसलं नाही. शिवसेना ही तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्यामुळं अन्यवेळी शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी होताना दिसते. आज ३९२ वी शिवजयंती साजरी होत असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. कोरोनाच्या निर्बंधांमुळे यंदा कोणतीही मिरवणूक काढण्यात आली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading