ठाण्यातील वैभव ज्वेलर्स या दुकानातून सुमारे ११ लाखांचे दागिने एका चोरट्याने लंपास केले आहेत. ठाण्यातील सावरकरनगरमध्ये असलेल्या वैभव ज्वेलर्स या दुकानातून एका वृध्द पती-पत्नीनं हा डल्ला मारल्याचं सांगितलं जातं. दागिने खरेदी करण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत या दाम्पत्यानं हे दागिने लंपास केल्याचं सांगितलं जातं.