ठाण्यातील पाणी देयक थकबाकी प्रकरणात २ हजाराहून अधिक जोडण्या खंडीत

ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षातील पाणी देयके तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत नळ संयोजन खंडीत करुन, पाणी पुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रुम सिल करणे, पंप जप्त करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसात थकबाकीदारांच्या 288 नळजोडण्या खंडीत करुन पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच आजपर्यंत एकूण 2005 जलजोडण्या खंडीत करण्यात आल्या असून 84 पंप रुम सील करण्यात आले आणि 355 पंप जप्त करण्यात आले आहेत.
तरी नागरिकांनी पाणी बिल एकरकमी भरणा करुन ‍३१ जानेवारी पर्यंत थकबाकीवरील 100 प्रशासकीय आकारामध्ये देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ घ्यावा आणि अप्रिय कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading