जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला. जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेतील पहिले लाभार्थी होण्याचा सन्मान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार यांना मिळाला. जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ तेवीस केंद्रांवर झाला. कोविन पोर्टलवर आरोग्य यंत्रणेतील 62 हजार 372 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण कार्यक्षेत्रातील 9 हजार 659 आणि महापालिका क्षेत्रातील 52 हजार 713 लाभार्थी आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. कोरोनाची लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading