ठाण्यातील धावपटू आणि चालणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्याची डॉ. महेश बेडेकर यांची मागणी

ठाण्यातील धावपटू आणि चालणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी ठाण्यातील सामाजीक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी पालीका आयुक्तांकडे केली आहे. यासाठी नियमीत सराव करणाऱ्या धावपटूच्या स्वाक्षऱ्या असलेलं एक निवेदनही त्यांनी पालिका आयुक्तांना दिलेलं आहे. अलीकडेच ठाण्यातील मॅरेथॉनपटू राजलक्ष्मी विजय यांचा सरावा दरम्यान अपघाती मृत्यू झाला होता. शहरामध्ये नागरीक आपल्या स्वास्थाकरता फेरफटका मारु शकतील अशी एकही जागा उरलेली नाही. दिव्यागांच्या अडचणीं बदृल तर न बोललेच बर. हिरानंदानी, मेडोज, उपवन परिसरामध्ये मॅरेथॅान धावपटू सराव करतात. उद्या कोणाचाही अपघाती मृत्यू होऊ शकतो. यासाठी बेशीस्त वाहनचालकांना आळा घालनं गरजेचं आहे.
यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महेश बेडेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading