ठाण्यातील थंडीचा कडाका वाढला

गेल्या दोन दिवसापासून ठाण्यातील थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या दोन दिवसापासून तापमानाचा पारा जवळपास १२ अंश सेल्सियसनं खाली घसरला आहे. तापमानाचा पारा खाली घसरल्यामुळं हवेतील गारठ्यात वाढ झाल्यानं ठाणेकर चांगलेच गारठून गेले आहेत. काल रात्री साडेआठपासून ते सकाळी साडेआठ पर्यंत साधारणत: तापमानाचा पारा सरासरी १६ अंशापर्यंत घसरला होता. थंडीत वाढ झाल्यामुळं सर्दी-खोकल्याच्या विकारांमध्येही वाढ झाल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading