जोशी-बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एक विद्यार्थी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एक विद्यार्थी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात चमकला आहे. जोशी-बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील जनसंज्ञापन विभागात तृतीय वर्षात शिकत असलेला रोहित पवार हा विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात चमकला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशभरातील विविध राज्यांचे चित्ररथ निवडले जातात. या चित्ररथातून त्या त्या राज्याची वैशिष्ट्ये सादर केली जातात. यंदा दिल्लीतील या संचलनामध्ये महाराष्ट्रतर्फे संत परंपरा या विषयावरील चित्ररथ सादर झाला होता. या चित्ररथामध्ये रोहित पवारची निवड झाली होती. चित्ररथावरील संत परंपरेमध्ये वारक-याच्या वेषामध्ये रोहित पवार सहभागी झाला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading