ठाण्यातील गौरी पितळेची नेदरलँडमध्ये बाजी

नेदरलँडमध्ये आयोजित केलेल्या कंदिल बनवण्याच्या स्पर्धेत ठाण्यातील गौरी पोतदार यांनी बाजी मारली आहे. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणा-या गौरी पितळे यांचं वास्तव्य सध्या नेदरलँडमध्ये आहे. यंदाची त्यांची तिथली पहिलीच दिवाळी होती. मराठी अस्मिता जपण्याचं काम करणा-या ऐनधोवन मराठी मंडळानं दिवाळीत कंदिल बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत गौरी पितळेनं सांझी या प्राचीन कलेत कंदिल साकारून प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. या स्पर्धेत एकूण २४ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत तिने मथुरा-वृंदावन मधल्या कागद कोरण्याच्या प्राचीन कलेचा उपयोग करत आकाशकंदिल बनवला. यासाठी तिला २७ तास लागले. तिला कलेची आवड असून सध्या ती टेक्सटाईल डिझायनिंग, ज्वेलरी मेकींग, डिजीटल आर्टचे फ्री लान्सिंग करत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading