ठाण्यातील गेल्यावर्षीची सरासरी पावसानं ओलांडली

ठाण्यामध्ये गेले तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्यावर्षीच्या पावसाची सरासरी ओलांडली गेली आहे. ठाण्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस होता. रविवारच्या २४ तासात २८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा जून महिन्यात हवा तसा पाऊस झाला नव्हता. जुलैच्या अखेरीस पावसाची चांगली सुरूवात झाली आणि ऑगस्ट मध्ये तर पावसानं कहर केला. गेल्यावर्षी ४ ऑगस्ट पर्यंत २ हजार ६८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. काल सकाळी साडेआठ वाजता पावसानं आपली ही गतवर्षीची सरासरी ओलांडली. कालच्या २४ तासात झालेल्या २८३ मिलीमीटर पावसामुळं जूनपासून कालपर्यंत २ हजार ६८९ मिलीमीटर पाऊस ठाण्यात झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading