जोरदार पावसामुळे यंदा प्रथमच गडकरी रंगायतनचा परिसरही जलमय

ठाण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे यंदा प्रथमच गडकरी रंगायतनचा परिसरही जलमय झाला होता. मात्र हा परिसर जलमय होण्यामध्ये निसर्गापेक्षा एक बांधकाम व्यावसायिक कारणीभूत ठरला. गडकरी रंगायतनच्या बाजूला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं कार्यालय असून त्या ठिकाणीच महापालिकेचं पंपिंग स्टेशन आहे. शहरातील पाणी या पंपिंग स्टेशनद्वारे खाडीमध्ये सोडले जाते. या पंपिंग स्टेशन समोरच नागरिक बिल्डरचं काम सुरू आहे. ज्येष्ठ विधीज्ञ प्रभाकर हेगडे यांच्या बंगल्याचं काम नागरिक करत असून त्यासाठी मोठा खड्डा खणण्यात आला आहे. या खड्ड्यामध्ये साचणा-या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतंही नियोजन नागरिक कडून करण्यात आलं नव्हतं. उलट खड्ड्यातील पाणी थेट मुख्य रस्त्यावर सोडून देण्यात आलं होतं. पावसाचा जोर वाढताच या साईटवरील पाणीही वेगानं मुख्य रस्त्यावर आले आणि ते समोरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तसंच घरांमध्ये आणि पंपिंग स्टेशनमध्ये शिरले. हे पंपिंग स्टेशन बंद पडलं असतं तर संपूर्ण ठाण्यात पूराचा धोका निर्माण होण्याची भीती होती. डॉ. मूस रोड जलमय होऊन पाणी रंगायतनच्या कंपाऊंडमध्ये घुसले होते अशी या परिसरातील नागरिकांची तक्रार होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading