ठाण्यातील एपी शहा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केले मुकबधीरांची भाषा बोलणारे हात मोजे


ठाण्याच्या ए. पी. शाह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मूकबधिरांची भाषा बोलणारे हातमोजे विकसित केले आहेत. ए. पी. शाह अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी साईनटोन नावाचे मूकबधिरांचे हावभाव ओळखून त्यातून आपल्या मोबाईल फोनवर आवाज ऐकायला येतो तसेच मेसेज देखील प्राप्त होतो असे हातमोजे तयार केले आहेत. यातून सर्वसामान्य माणसांना मूकबधिर लोकांशी संवाद साधने सोपे जाणार आहे, असे या महाविद्यालयाचे डीन प्रा. समिर नानिवडेकर यांनी सांगितले. हा अविष्कार साकेत सप्रे, राज फडतरे, प्रथम पारखे आणि प्रसाद मराठे या ठाणेकर विद्यार्थांनी प्राचार्य डॉ. उत्तम कोळेकर, प्रा. डॉ. संग्राम सावरगावे, प्रा. अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading