आमदार संजय केळकरांच्या पुढाकारानं लोक सहभागातून साकारली नाले दत्तक योजना

दरवर्षी नालेसफाई होत असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडत असताना आमदार संजय केळकर यांनी आदर्श नाले बांधणी आणि नाले दत्तक योजनेचा अभिनव प्रयोग ठाणे शहरात मांडला आहे. लोकसहभागातून होत असलेल्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून त्याची पाहणी त्यांनी केली.
शहराला नाल्यांची समस्या कायम भेडसावत असून नालेसफाईतून दरवर्षी मोठा भ्रष्टाचार होत असतो. आमदार संजय केळकर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची पाहणी करून प्रशासनाला सूचना करत असतात. ही समस्या कायमस्वरूपी सुटावी आणि भ्रष्टाचार थांबावा यासाठी त्यांनी लोकसहभागातून आदर्श नाले बांधणी आणि नाले दत्तक योजना ही संकल्पना पुढे आणली. जागर फाऊंडेशन या संस्थेने आयुक्तांकडे याबाबतचा प्रस्ताव दाखल केला तर केळकर यांनी आयुक्तांना याबाबतची उपयुक्तता पटवून दिल्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी योजनेस हिरवा कंदील दिला. या प्रकल्पाची पाहणी करताना आमदार संजय केळकर यांनी समाधान व्यक्त केले. हा प्रयोग ठाण्यात प्रथमच राबवला जात असून परिसर सुंदर आणि स्वच्छ राहणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात अनेक ठिकाणी त्याची मलबजावणी करून नाले भ्रष्टाचारमुक्त करता येतील, पर्यायाने ठाणेकरांनी महापालिकेला कररुपाने दिलेल्या पैशांची उधळपट्टी होणार नाही, असे मत केळकर यांनी मांडले. या योजनेसाठी डॉ.मूस मार्गालगतचा नाला निवडण्यात आला. अंदाजे ३००फूट लांब आणि ३० फूट रुंद नाल्यावर आधुनिक पद्धतीने आवरण चढवण्यात येऊन पलिकडून वाहत येणारी घाण ठराविक अंतरावर रोखण्यात येणार आहे. त्यामुळे पुढे पाण्याचा प्रवाह मोकळा होणार आहे. साचलेली घाण काढण्यासाठी पोकलेन उतरेल अशी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूस आवरण करण्यात येणार असून व्हर्टीकल गार्डन करता येणार आहे. यामुळे परिसर सुंदर दिसेलच, शिवाय नाला दुर्गंधीमुक्त होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading