ठाण्यातील अपूर्वा पाटीलला 78 किलो वजनी गटात सुवर्णपदक

गुजरातमधील मेहसाणा येथे झालेल्या खेलो इंडिया वुमन्स जुडो नॅशनल लीग अँड रँकिंग टूर्नामेंट स्पर्धेत ठाण्यातील अपूर्वा पाटील हिने 78 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. हे सुवर्णपदक प्राप्त करताना अपूर्वा पाटीलने गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या टीमच्या बलाढ्य स्पर्धकांवर मात केली आहे. खेलो इंडिया वुमन्स लीग या स्पर्धेची पुढची फेरी म्हणजेच नॅशनल ही ऑक्टोबरमध्ये दिल्ली येथे होणार असून त्या स्पर्धेत खेळण्यासाठी अपूर्वाची निवड झाली आहे. अपूर्वा ही सरस्वती क्रीडा संकुल येथे देवीसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading