ठाण्याच्या माधुरीका पाटकरला अर्जुन पुरस्कार

ठाण्याच्या माधुरीका पाटकर हिला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. या यशामुळे मधुरिका पाटकरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यंदा कोरोनामुळे पहिल्यांदाच या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन राष्ट्रपती भवनात न होता ऑनलाईन झालं. विविध विभागांमध्ये एकूण ७४ जणांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यात २६ जणांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त खेळाडू आपापल्या शहराच्या स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सेंटरमधून हजर होते. ठाणेकर मधुरिका पाटकरच्या शिदोरीत तब्बल सव्वाशेहून अधिक पदकं असून यातील सुमारे पंधरा पदक हि तिने राष्ट्रीय पातळीवरील खेळासाठी कमावली आहेत. १३ वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप मिळवलेल्या मधुरिकाला शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित केले असून युथ नॅशनल चॅम्पियनशिप, ठाणे क्रीडा पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार, ठाणे गौरव पुरास्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading