ठाण्याच्या माजी पोलीस आयुक्तांसह २८ जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे-मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रिकेट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आदेशानं प्रदीप शर्मा आणि पोलीस निरिक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिका-यांनी धमक्या देऊन साडेतीन कोटी रूपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी केली होता. या दोघांच्या तक्रारीनंतर ठाणे नगर पोलीसांनी या दोघांचे जाबजबाब नोंदवून घेतले. या दोघांनी आपल्या जबाबा बरोबरच अनेक पुरावेही सादर केले. मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करून त्यातून सुटकेसाठी १ कोटी १८ लाखांची मागणी परमवीर सिंग यांच्या सांगण्यावरून प्रदीप शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी केला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात आत्तापर्यंत परमवीर सिंग यांच्याविरोधात ३ गुन्हे दाखल झाले आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading