ठाण्याच्या ब्रम्हाळा तलावात एक आजारी कासव सापडल

ठाण्याच्या ब्रम्हाळा तलावात एक आजारी कासव सापडल आहे. काही जागरूक नागरिकांनी ब्रह्माला तलावामध्ये कासव रंगत असल्याची माहिती मान्य जीव कार्यकर्त्यांना दिली होती. वन्यजीव कार्यकर्त्यांनी या माहितीवरून काही कार्यकर्त्यांना ब्रह्माला तलावात पाठवलं आणि या कासवाची माहिती घेतली. त्यानंतर या कासवाची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वन्यजीव संरक्षक कार्यकर्त्यांनी या कासवाची सुटका केली. त्यावेळी हे कासव आजारी असल्याचे लक्षात आलं. डॉक्टर चारीयर यांनी या कासवाची तपासणी केली असता या कासवाला निमोनिया झाल्याचे लक्षात आले. आता या कासवा वरती उपचार सुरू असून त्याला आठ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच या कासवा बाबतचा निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं. हे कासव मृदू पाठीच कासव असल्याचं सांगितलं जातं. या कासवाची लांबी साधारणता दोन फूट आहे. या कासवावर योग्य उपचार झाल्यानंतर वनविभागाच्या सल्ल्याप्रमाणे या कासवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं जाईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading