शिवसेना ठाणे जिल्ह्याच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धाचे 2022 आयोजन

शिवसेना ठाणे जिल्ह्याच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा 2022 आयोजित केली असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या अभिनव स्पर्धेचे 30 वे वर्षे असून त्यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आजतागायत अखंडीत चालू ठेवली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या उत्साहाला विधायक वळण मिळावे व त्यातून समाजप्रबोधनाचे, हिंदुत्वाचे व राष्ट्रीयत्वाच्या भावना वाढीस लागाव्यात या हेतूनेच या स्पर्धेचे आयेाजन गेले 30 वर्षे केले जात आहे. श्री गणेश दर्शन स्पर्धा ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे. या स्पर्धेत ठाणे शहरासाठी प्रथम पारितोषिक 1,00,000रु, द्वितीय पारितोषिक 75,000रु आणि स्मृतीचिन्ह, तृतीय पारितोषिक रु. 50,000रु, चतुर्थ पारितोषिक 25,000रु ,पाचवे पारितोषिक रु. 21,000रु, क्र. 6 ते 10 पर्यत पारितोषिके रु15,000 ची पारितोषिके आणि स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तर तीन विशेष पारितोषिके असून त्यांना 10,000रु आणि स्मृतीचिन्ह, उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास 10,000रु आणि स्मृतीचिन्ह, उत्कृष्ट मूर्तीकार 10,000रु व स्मृतीचिन्ह तर उत्तेजनार्थ पारितोषिके 15 असून 10,000रु स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे. तर आदर्श विसर्जन मिरवूणक काढणाऱ्या मंडळास 1000रु आणि स्मृतीचिन्ह आणि उत्कृष्ट सजावटकारास 10,000रु आणि स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येईल. कल्याण शहर (सजावटीसाठी) प्रथम पारितोषिक 25,000रु, द्वितीय पारितोषिक 21,000रु, तृतीय पारितोषिक 15,000रु, उत्तेजनार्थ पारितोषिक रु. 10,000रु आणि स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे. (उत्कृष्ट मुर्तीसाठी) प्रथम पारितोषिक 11,000रु, द्वितीय पारितोषिक 7500रु , तृतीय पारितोषिक 5000रु व स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिक 5000रु आणि स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे. देखाव्यातून हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातील. अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवांना या स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेचे प्रवेश अर्ज 25 ते 30 ऑगस्ट या कालावधीत आनंदाश्रम, टेंभीनाका येथे उपलब्ध आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading