ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यामुळे एका बालिकेला मिळाला कृत्रिम हात

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यामुळे एका बालिकेला हात मिळाला आहे. पूनम करावे या ९ वर्षाच्या बालिकेची जन्मताच उजव्या हाताची वाढ कोपऱ्यापर्यंतच झाली होती. त्यामुळे जे काही करायचे ते एका हाताने आणी तेही डाव्या हाताने त्यामुळे पूनमला फार अडचणी यायच्या. आई वडिलांनी तिला कृत्रिम उजवा हात मिळावा म्हणून प्रयत्न केले पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने इच्छा असून सुद्धा ते काही ही करू शकत नव्हते. ही बाब आमदार संजय केळकर यांना समजताच त्यांनी तातडीने ‘संजय फाउंडेशन’ च्या माध्यमातून पूनमला कृत्रिम हात देण्याचे ठरवले आणी एक महिन्यात पूनमला नवीन कृत्रीम हात दिला. याकरिता इनाली फाउंडेशन, रोटरी क्लबच्या नम्रता श्रीवास्तव आणी अर्पित माथुर यांचेही सहकार्य मिळाले. आज पूनम त्या कृत्रीम हाताने बॅटमिंटन खेळते, क्रिकेट खेळते, सायकल चालवते, वस्तू उचलते, तोच हात वर करून डान्स करते, अगदी सर्व करण्याचा प्रयत्न करते, आनंदात असते. आणी हे सर्व शक्य झाले ते संजय केळकर यांनी पूनमच्या बाबतीत घेतलेल्या पुढाकाराने.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading