ठाण्याचे आगामी महापौर म्हणून नरेश म्हस्के तर उपमहापौर म्हणून पल्लवी कदम यांची होणार निवड

ठाण्याच्या महापौर पदासाठी नरेश म्हस्के तर उपमहापौर पदासाठी पल्लवी कदम यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ठाणे महापौर पदासाठी २१ नोव्हेंबरला निवडणूक होणार असून आज महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. त्यानुसार शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी नरेश म्हस्के यांना तर उपमहापौर पदासाठी पल्लवी कदम यांना उमेदवारी दिली आहे. सध्या बदललेल्या राजकारणाचा कल पाहता महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सभागृहामध्ये शिवसेनेचं बहुमत असून आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही शिवसेनेच्या जवळ आल्यामुळं बहुधा ही निवडणूक बिनविरोध होईल असं दिसत आहे. महापौर पदासाठी नरेश म्हस्के आणि देवराम भोईर यांची नावं चर्चेत होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेश म्हस्के ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे गेल्यानं म्हस्के यांची म्हस्के यांची इच्छा अपुरी राहिली होती. आता शिवसेनेनं त्यांना महापौर पदासाठी उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading