ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांची निवड

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांची निवड झाली आहे. पत्रकार संघाच्या 2023-24 च्या कार्यकारिणीसाठी मतदान झाले. अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे आणि आनंद कांबळे यांना समसमान 44 मते मिळाली. 2 वर्षांच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदासाठी शिंदे आणि कांबळे यांनी सामंजस्याने प्रत्येकी एकेक वर्ष अध्यक्षपद भूषविण्याचा निर्णय सहमतीने घेतला. पहिल्या वर्षांसाठी आनंद कांबळे अध्यक्ष म्हणून काम पाहणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या समोर चिठ्ठया टाकून निर्णय घेण्यात आला. पुढील वर्षी अध्यक्षपदाची धुरा दिलीप शिंदे सांभाळणार आहेत. संघाची अन्य कार्यकारिणी उपाध्यक्ष – दीपक शेलार, कार्याध्यक्ष- विकास काटे, सरचिटणीस – निलेश पानमंद, सहचिटणीस – गणेश थोरात, खजिनदार – विभव बिरवटकर (बिनविरोध), सदस्य – युनूस खान, प्रफुल्ल गांगुर्डे,अशोक गुप्ता, सचिन देशमाने,अमर राजभर, पंकज रोडेकर, महिला राखीव- अनुपमा गुंडे (बिनविरोध) अशी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading