जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून डोंबिवली मध्ये “पै फ्रेंड्स लायब्ररी “च्या वतीने भव्य बुक स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीतील मॉर्डन कॅफे चौक ते दातार चौक परिसरामध्ये जमिनीवर कार्पेट टाकून या पुस्तकांची मांडणी करण्यात आली. या बुक स्ट्रीट मध्ये तब्बल एक लाखांपेक्षा जास्त पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. यामध्ये कथा, कादंबऱ्या, ऐतिहासिक, विज्ञान विषयक आणि लहान मुलांसाठी कॉमिक बुकची मांडणी करण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या आणि भव्य बुक स्ट्रीटला विविध भागातून वाचक भेट देत असून आत्तापर्यंत हजारो वाचकांनी या बुक स्टॉलला भेट दिली आहे.