ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शनिवारी १२ तास बंद राहणार

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शनिवारी १२ तास बंद राहणार आहे. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत जेल जलकुंभाची इनलेट जलवाहिनी ही के- व्हीला नाला येथील पुल प्रकल्पाच्या कामात 500 मिमी व्यासाची इनलेट जलवाहिनी बाधीत होत आहे. ही बाधित जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम सुरु असल्यामुळे शनिवारी हे इनलेट जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन करण्याचे काम हाती घेतल्याने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे उथळसर प्रभाग समिती मधील जेल जलकुंभ अंतर्गत श्रीरंग सोसायटी परिसर, राबोडी 1, राबोडी 2, पंचगंगा, आकाशगंगा, के-व्हीला परिसर, पोलीस लाईन, टेंभीनाका, सिव्हील हॉस्पिटल, ठाणे जेल, आरटीओ परिसर, कॅसल मिल, धोबी आळी आणि उथळसर या भागांचा पाणी पुरवठा 12 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading