ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये नवीन पंपिंग मशिनरी बसविण्यासाठी तसेच इतर अत्यावश्यक कामे करण्यासाठी बुधवार १२ जानेवारी रोजी सकाळी ९ ते गुरुवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटर्निटी, कोलशेत तसेच आझादनगर या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा आणि मुंब्रा परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो साठा करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading